देशातच दारूबंदी करण्याचा सल्ला पंतप्रधानांना द्या, म्हणजे प्रश्नच उरणार नाही : विजय वडेट्टीवार

टाळेबंदीच्या तिस-या टप्प्यात दारू विक्रीचे दुकान उघडण्याचा निर्णय अर्तक्य आहे, अशी टिका डॉ. अभय बंग यांनी केली होती. या टिकेचा बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चांगलाचा समाचार घेतला. बंग यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोंदींना माहित आहे. बंग यांनी आता थेट पंतप्रधानांना सल्ला देवून देशातीलच दारूबंद करावी. त्यामुळे हा विषयच यामुळे राहणार नाही आणि देश कसा चालवायाचा याचे मोंदींना मार्गदर्शन करावे, अशी टिका वडेट्टीवार यांनी बंग यांच्यावर केली. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा आढावा घेण्यासाठी गठीत समितीच्या पाश्र्वभूमीवर यापूर्वी डॉ. बंग यांनी टिका केली होती. तेव्हाही वडेट्टीवार यांनी त्यांना प्रत्तुत्तर दिले होते. आता पुन्हा हे दोघेही समोरासमोर आले आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशभरात टाळेबंदी सुरू आहे. टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात काही शिथिलता देण्यात आली. त्यात केंद्राने राज्यातील दारू दुकान सुरू करायला हिरवी झेंडी दाखविली. महाराष्ट्र शासनाने काही जिल्ह्यात दारूविक्रीला परवानगी दिली आहे. यावर डॉ. बंग यांनी टिका केली होती. दारूदुकान सुरू केल्यामुळे घरपोच कोरोना पोहचविण्याची व्यवस्था झाली आहे. हा अर्तक्य निर्णय आहे, असे ते म्हणाले. यावर आता वडेट्टीवार यांनी टिकास्त्र सोडले. डॉ. बंग फार मोठे आहे. त्यांच्यासंदर्भात आवश्यकता पडेल तेव्हा बोलणारच आहे. त्यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. त्यामुळे देशातच दारूबंदी करण्याचा सल्ला त्यांनी पंतप्रधान मोंदीना द्यावा. त्यामुळे ही समस्याच कायमच निघून जाईल आणि त्यांना वारंवार यावर बोलावे लागणार नाही. सोबतच महसूल कसा वाढवावा याचा सल्लाही त्यांनी पंतप्रधानांना द्यावा. दारूमुळे दरवर्षी पाच लाख लोकांचा मृत्यू होतो. ही आकडेवारी आली कुठून. जी गोष्ट सरकारला माहित नाही. त्या गोष्टीची खडान्खडा माहिती असते, असा चिमटाही वडेट्टीवारांनी काढला. सरकार चालविण्यासाठी पैशाची गरज असते. त्यांची एनजीओ चालविण्यासाठी सुद्धा पैसा लागतो. त्यांचा मुलगा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कक्षात बसायचा. तेव्हाच डॉ. बंग यांनी राज्यातील दारूबंदी करण्याचा सल्ला फडणवीस यांना द्यायला हवा होता. त्यांचे अनंत उपकार महाराष्ट्रावर झाले असते, असा टोला वडेट्टीवार यांनी डॉ. बंग यांना लावला.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here