लॉकडाऊनमुळे आंबा निर्यातीवर परिणाम, गतवर्षीच्या तुलनेत निर्यातीत 50 टक्क्यांची घट

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे नाशिवंत आंबा पिकावर संकट ओढवले. लॉकडाऊनमुळे आंबा विक्रीचा प्रश्न निर्माण झाला असतानाच वाशी मार्केट येथून सुरु असलेल्या निर्यातीमुळे आंब्याची परदेशात विक्री झाली. एप्रिलमध्ये ४,१२० मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली असून निर्यातीमध्ये प्रामुख्याने हापूस आंब्याचा समावेश होता. बहरीन, कुवेत, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड इत्यादी देशांमध्ये निर्यात झाली. गतवर्षी एप्रिलमध्ये ८,८३५ मेट्रिक टन आंब्याची निर्यात झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्के निर्यात असली तरी कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटामुळे जलवाहतुकीने झालेली निर्यात निश्चितच समाधानकारक आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here