पोमेंडी खुर्द येथे २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी : २४ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या हॉलमधील छपराच्या मधल्या आडाच्या वाशाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी पोमेंडी खुर्द येथे सायंकाळी ६.१५ वा.सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण समजू शकले नसून याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शिवकुमार शांताराम रहाटे (२४, रा.पोमेंडी खुर्द,रामेश्वरवाडी, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ चैतन्य शांताराम रहाटे (२०) याने शहर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी घरात कोणीही नसल्याचे पाहून शिवकुमारने घरातील हॉलमध्ये छपराच्या वाशाला आंबा काढण्याच्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. सायंकाळी ६ वा.सुमारास चैतन्य घरी गेला तेव्हा त्याला शिवकुमार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here