रत्नागिरी : वाढत्या उकाड्याने सर्व नागरिकांना हैराण करून सोडले आहे. कोकणात मळभी आच्छादन असताना गेले दोन दिवस तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. गेल्या दोन दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात तापमानाने उचल घेतली आहे. सोमवारी जिल्ह्यात ३३, मंगळवारी ३४, तर बुधवारी तापमानाने ३५ अंश सेल्सिअसचा पारा ओलांडला. त्यामुळे वाढलेल्या तापमानाने नागरिक हैराण होत आहेत.
