भोस्ते घाटात सिमेंटवाहू ट्रक उलटला

0

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटातील अवघड वळणावर बुधवारी पुन्हा एकदा सिमेंट वाहून नेणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात मनुष्यहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी झाली आहे.

भोस्ते घाटातील त्या अवघड वळणावर होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी महामार्ग बांधकाम विभागाकडून तब्बल 10 गतिरोधक बसविण्यात आले आहेत. स्पीड ब्रेकर्समुळे उतारावरील वाहनांचा स्पीड कमी होईल आणि अपघातांना आळा बसेल, असे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना वाटते, मात्र स्पीड ब्रेकर्सचं अपघाताचे कारण ठरू लागले आहेत.

हा ट्रक सिमेंट घेऊन चिपळूण दिशेकडून मुंबईकडे चालला होता. तीव्र उतारावरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वळणावर ट्रक पलटी झाला. त्यामुळे सिमेंटच्या गोण्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या. या अपघातात चालक सुदैवाने वाचला असला, तरी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 15-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here