आपडे फाट्यानजीक भरधाव डंपरची एस.टी. बसला धडक

0

खेड : मुंबई – गोवा महामार्गावरील आपडे फाटानजीक प्रवासी घेण्यासाठी उभ्या असलेल्या खेडतर्फे वावे नातू एस. टी. बसला भरधाव वेगात असलेल्या डंपरने पाठीमागून धडक दिली. गुरुवारी सकाळी ७.४५ वा. सुमारास घडलेल्या या अपघातात ७ विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांना चिपळूण येथील लाइफ केअर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वावे तर्फे नातू येथून खेडच्या दिशेने प्रवासी घेऊन येणारी एस. टी. बस मुंबई-गोवा महामार्गावरील आपडे फाटा येथे प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. त्याच वेळी पाठीमागून येणाऱ्या मालवाहू डंपर ने बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी एकमेकांवर आदळून गंभीर जखमी झाले. या अपघातात बाळू मारुती गिरी ३९, भरणे चालक, श्रेयश संतोष भुवड, रा. वावे १७, वावे, ऋतिक राजेश गावडे रा.१८, नातूनगर, ओंकार भगवान मांडवकर रा. १९, बोरघर, सागर दत्ताराम कदम २१,रा. चिंचवली, रिंकी राहुल मोरे १७, रा. नातूनगर, राकेश रमेश राक्षे १७, रा. चिंचवली, योगिता रघुनाथ मोरे १९, रा. नातूनगर, संगीता रामचंद्र कावणकर १८,रा, वावे, साजन तुकाराम हंबीर १८, रा. कळंबणी, शामल महेंद्र जाधव १८, रा. चिंचवली, अजित उदय कांदकर १८, रा. नातनगर, रोशनी बळवंत जाधव १९, रा. चिंचवली, स्मिता बाबाजी जाधव १७, रा. चिंचवली हे विद्यार्थी जखमी झाले. त्यांना तात्काळ १०८ रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र या पैकी ऋतिक गावडे, राकेश राक्षे, संगीता कावणकर, शामल जाधव, रोशनी जाधव, स्मिता जाधव हे विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याने त्यांना कळवणी रूग्णलयातून अधिक उपचारासाठी चिपळूण येथील लाइफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उर्वरित जखमी असलेल्या ७ जणांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठवून देण्यात आले आहे.
LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here