मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर देवरुख नगर पंचायतीची दंडात्मक कारवाई

देवरूख : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. न केल्यास प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर देवरूख नगर पंचायतीने दोन दिवसांमध्ये पाच जणांवर दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी ५०० रुपये दंड वसूल केला. बाजारपेठ व सार्वजनिक ठिकाणी पहिल्या टप्प्यात कारवाई सुरू केली. न.पं. चे कर्मचारी बाजारपेठेत उभे केले आहेत. यापुढेदेखील अशीच कारवाई सुरू राहणार आहे. यामुळे नागरिकांनी मास्कशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन नगर पंचायतीतर्फे करण्यात आले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here