महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां जानेवारी महिन्यात रंगणार

0

मुंबई : भारतात अलीकडे क्रिकेटशिवाय इतर खेळांबाबतही जागुरकता वाढत असून नुकत्याच झालेल्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं कमाल अशी कामगिरी केली.

दरम्यान महाराष्ट्राचे खेळाडूही विविध खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवत आहेत. अशात राज्यातील शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रातून आगामी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांसाठी दर्जेदार क्रीडापटू तयार व्हावेत, या हेतूने महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. 1 ते 12 जानेवारी या कालावधीत या स्पर्धा पार पडणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली.

या महाराष्ट्र ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामहाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, महाराष्ट्र शासन आणि क्रीडा व युवक संचालनालय यांच्या संयुक्त विद्यामाने होणार आहेत. स्पर्धेच्या ठिकाणाचा विचार करता पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक, नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत होणार असून, विविध अशा 39 क्रीडा प्रकार या स्पर्धेत खेळवले जाणार आहेत.

क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी सह्यााद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा राज्यस्तर आयोजन समितीच्या बैठकीत या स्पर्धेच्या आयोजनासह स्थळांची माहिती देण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर उपस्थित होते. याशिवाय सुहास दिवसे (आयुक्त, क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणे), रणजित देवोल (सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग), चंद्रकांत कांबळे (सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय), तेजस्विनी सावंत (अर्जुन पुरस्कार विजेती नेमबाज), प्रदीप गंधे (ध्यानचंद पुरस्कार विजेते, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष), निलेश जगताप (महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य) हे मान्यवरही उपस्थित होते.

कोणत्या खेळांचा होणार समावेश?
तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅनोइंग आणि कयाकिंग, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, ज्युडो, कबड्डी, खो-खो, टेनिस, मॉडर्न पेंटॅथलॉन, नेमबाजी, रोइंग, रग्बी, जलतरण-वॉटरपोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, सायकलिंग (रोड आणि ट्रॅक), नेटबॉल, सेपक टेकरॉ, स्क्वॉश, यॉटिंग अशा ३२ क्रीडा प्रकारांसह नुकत्याच गुजरात येथे झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात क्रीडा प्रकारांचा महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 15-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here