दारूतून मिळणाऱ्या महसूलापेक्षा करोनाचा धोका अधिक वाढणार असेल तर याचा काय उपयोग? : अण्णा हजारे

अहमदनगर : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारनं वाइन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला अण्णा हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. ‘करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे बाकी असताना केवळ महसूल मिळावा म्हणून दारूची दुकाने सुरू करणे ही सरकारची विनाशकाले विपरित बुद्धी आहे’, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला फटकारले आहे. ‘दारू ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. ती मिळाली नाही तर लोक उपाशी मरणार नाहीत. मग सरकारला असा निर्णय अचानक का घ्यावा लागला? सध्याच्या परिस्थितीत सरकार दारू विक्री करून काय साध्य करणार? दारूतून मिळणाऱ्या महसूलापेक्षा करोनाचा धोका अधिक वाढणार असेल तर याचा काय उपयोग? ‘तुम्ही लोकांना वाचवण्याचा विचार करणार की महसूल गोळा करण्याचा,’ असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here