दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्राच्या जखमेवर फक्त मीठ चोळलं गेलं : उद्धव ठाकरे

0

मुंबई : महाविकासाघाडीने आज मोर्चाच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेतली. महापुरुषांचा अपमान, बेळगाव सीमा प्रश्न आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हटवण्याची मागणी या मुद्द्यांवर मुंबईत हा मोर्चा निघणार आहे.

दिल्लीत काल गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीत काहीच साध्य झालं नसल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ‘दिल्लीत जी बैठक झाली. त्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हा प्रश्न चिघळला जातोय. पण ट्विटबाबत खुलासा करायचा इतके दिवस का लागले. पोलीस कारवाई झाली. महाराष्ट्रातल्या वाहनांना बंदी घातली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने जागृत असायला हवं. की आपल्या ट्विटरवरुन कोण बोलत आहे. बैठकीत फक्त मीठ चोळलं गेलं आहे. मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री फक्त हो ला हो म्हणून आले आहेत.’

‘सुप्रीम कोर्टात हा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे.कोर्टात प्रकरण असताना कोणी काही करु नये.असं असतंच. तरी बेळगावला उपराजधानीचा दर्जा दिला गेला होता.नुसतं महाराष्ट्रानेच हे पाळायचं का? कालच्या बैठकीत नवीन काय घडलं.बैठकीचा अर्थ काय होता. कर्नाटककडून नेहमीच प्रश्न चिघळवला गेलाय

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी म्हटलं की, ‘लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा काढणार आहोत.त्यासाठी सर्व परवानग्या मागितल्या आहेत. आमचा मोर्चा निघणार आहे. संपूर्ण राज्यातील लोकं या मोर्चात सहभागी होतील. यासाठी राज्यातील जनतेसाठी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आवाहन देखील करत आहे.

‘मी उपमुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती विचारली. तेव्हा कळालं की, देशाचे गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीत दोन्ही राज्यातील जनतेने शांतता ठेवावी.असं ठरलं. दोन्ही राज्यातील ३-३ मंत्री या समितीमध्ये राहतील. सुप्रीम कोर्टात जेव्हा हे प्रकरण जाईल तेव्हा हरीश साळवे यांनी महाराष्ट्राकडून बाजू मांडावी. यासाठी मागणी केली आहे.’

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:59 15-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here