मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता या विषाणूचा मुंबईतील मंत्रालयातही शिरकाव झाला आहे. एका विभागाच्या प्रधान सचिवांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर सर्व सहकाऱ्यांनाही क्वारंटाइन करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मंत्रालयाच्या इमारतीतील कामकाज दोन दिवसांसाठी बंद करण्यात आलं होतं. आता या अधिकाऱ्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मंत्रालयातील एकूण करोनाबाधितांची संख्या ही सहावर पोहोचली आहे.
