रस्त्यात अडवून मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

निवळी : रस्त्यात अडवून पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास लक्ष्मण सावंत (वय ३७, रा. निवळी, बावनदी-बौद्धवाडी) हे बुधवारी ६ मे रोजी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी चालत जात असताना समाधान रामचंद्र सावंत व प्रभाकर अनंत सावंत (दोन्ही रा. निवळी, बावनदी-बौद्धवाडी) यांनी त्यांना अडवून पूर्ववैमनस्याचा राग मनात धरून अश्‍लिल शिवीगाळ केली. त्यावेळी सावंत यांनी तुम्हाला काय सांगायचे ते पोलीस स्टेशनला जावून सांगा असे सांगून ते घराकडे निघून जात असताना समाधान याने रामदास यांच्या उजव्या गालावर हाताच्या ठोशाने मारून प्रभाकर यांनी त्यांचा शर्ट पकडला. यावेळी समाधान याने दांडक्याने मारहाण केली. ही मारहाण निवळी-बावनदी पाण्याचे पंप हाऊसजवळ घडली. याप्रकरणी रामदास लक्ष्मण सावंत यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून समाधान व प्रभाकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
6:43 PM 07-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here