अभिनेता रणवीर सिंह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’त सादर करणार स्किट

0

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत.

केवळ मराठीच नाही, तर इतर भाषिक लोकही हा कार्यक्रम तितक्याच आपुलकीने पाहत असतात. याचे दाखले हास्यजत्राच्या कलाकारांना प्रवासात नेहमीच अनुभवायला मिळालेले आहेत. हा कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नसून जगभरात प्रसिद्ध आहे. आता या कार्यक्रमात ‘सर्कस’ सिनेमाची टीम हजेरी लावणार आहे.

प्रेक्षक ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाकडे निखळ मनोरंजनाचं साधन म्हणून पाहत असतो. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचे चाहते दिग्गज कलावंत आणि मोठी व्यक्तिमत्त्वं आहेत आणि अशा कलावंतांनी हास्यजत्रेत सहभाग घेतला आहे. आता बॉलिवूडच्या शिखरावर पोचलेला दिग्गज अभिनेता रणवीर सिंह ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात स्किट सादर करणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:18 16-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here