जिल्ह्यात चाकरमान्यांच्या व्यवस्थेसाठी 12,000 ठिकाणे निश्चित

रत्नागिरी : लॉकडाऊनमध्ये अडकलेले मजूर, विद्यार्थी आता आपापल्या गावी जाण्यासाठी तयार झाले आहेत. बाहेर गावाहून चाकरमान्यांना कोकणात आणण्याच्या हालचाली शासनाकडून चालू आहेत. अशातच चाकरमान्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भागात 12 हजार ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहे. त्यामध्ये 73 हजार लोकांची व्यवस्था करता येऊ शकते. त्यामध्ये शाळा, समाजमंदिरांचा समावेश आहे. चाकरमान्यांचे गावात स्वागत करा असे पत्रही जिल्हाधिकार्‍यांनी सरपंचांना पाठविले आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here