राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अमेय सावंत कांस्य पदकाचा मानकरी

0

रत्नागिरी : पुणे येथे 12 ते 14 डिसेंबर रोजी झालेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी च्या एसारके तायक्वांदो क्लब मारुती मंदिरचा प्रशिक्षणार्थी अमेय अमोल सावंत याने वर्षांखालील 87 किलो खालील वजनी गटात कांस्य पदक मिळवत उत्तम कामगिरी केली असून वरिष्ठ अर्थात सिनियर गटाची ही पहिलीच स्पर्धा असून यापूर्वी त्याने सब ज्युनिअर आणि ज्युनिअर गटात राज्य राष्ट्रीय पातळीवर रत्नागिरीच नाव उज्ज्वल केलं आहे.

त्याला आजवर एसारके तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष, प्रमुख प्रशिक्षक व तालुका सचिव शाहरुख शेख यांचं मार्गदर्शन लाभल आहे.
त्याच्या या कामगिरीबद्दल तामचे महासचिव मिलिंद पाठारे, तांत्रिक कमिटी अध्यक्ष प्रवीण बोरसे, ताम उपाध्यक्ष अविनाश बारगिजे, ताम सदस्य वेंकटेश कररा तसच जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा तालुकाध्यक्ष राम कररा, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत माकवाना सदस्य शीतल खामकर, प्रदीप कीर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 17-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here