मागासवर्गीय विद्युत कर्मचाऱ्यांचा २१ डिसेंबरला मोर्चा

0

रत्नागिरी : पदोन्नतीतील आरक्षण लागू करण्याच्या मागणीसह मुंबई परिसरातील वीज वितरण अदाणी समूहाला सोपविण्याच्या प्रस्तावाविरोधात विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

पूर्ततेसाठी मागण्यांच्या संघटनेतर्फे कालबद्ध आंदोलनाची रूपरेषाही निश्चित करण्यात आली आहे. शुक्रवार, १६ डिसेंबर रोजी परिमंडळ / मंडळ स्तरावर राज्यव्यापी द्वारसभा घेण्यात येणार आहे.

१९ डिसेंबर रोजी तिन्ही वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनासोबत असहकार आंदोलन, २९ डिसेंबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरील वीज कर्मचाऱ्यांच्या मोर्चात सहभाग, ४ जानेवारीपासून ७२ तासाचा लाक्षणिक संप, १६ जानेवारी रोजी परिमंडळ / मंडळस्तरीय राज्यव्यापी द्वारसभा घेणे, १८ जानेवारीपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. स्वतंत्र मजदूर युनियनही या मोर्चात सहभागी होणार आहे, असे सांगण्यात आले आहे. या संघाने ७ मे २०२१ चा शासन निर्णय रद्द करून मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षणासह खुल्या प्रवर्गातून पदोन्नत्ती लागू करावी, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली आहे.

तसेच वीज कंपन्यांचे प्रस्तावित खासगीकरण रद्द करावे, असंघटित कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू करावे, शासनाच्या सर्व विभागातील मागासवर्गीयांच्या रिक्त पदे अनुशेषासह भरावे, अंगणवाडी सेविकांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करावी, इमारत बांधकाम व सर्व असंघटित कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी कायदा करावा, स्वतंत्र मजदूर युनियनला शासन पातळीवर मान्यता, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:03 17-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here