रत्नागिरी : लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी केलेल्या विनंती अर्जानुसार मंजुरी प्राप्त झालेल्यांना राज्यातील इतर जिल्ह्यांत पाठविण्यासाठी अशा सर्वांना आज ८ मेपासून जिल्ह्यातील विविध बसस्थानकावरून एस.टी.मार्फत जाता येणार आहे. अशा एकूण २५ बसेस तीन दिवसांत शुक्रवारपासून जिल्ह्यातून सोडण्यात येणार आहेत. शुक्रवारपासून जिल्ह्यातील विविध बसस्थानकांमधून सिंधुदुर्ग, रायगड (अलिबाग), बुलढाणा, लातूर, भंडारा, सातारा, गोंदिया आणि अमरावती या ८ जिल्ह्यांना जाणाऱ्या बसेस सुटतील. शुक्रवारी ६ बसेस, शनिवार दि. ९ रोजी १६ बसेस तर रविवार दि.१० रोजी ३ बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवासाचे आरक्षण केलेल्या आगार बसस्थानकावर बस सुटण्यापूर्वी किमान दोन तास उपस्थित राहणे आवश्यक आहे. बसमध्ये सुरक्षित अंतर ठेवूनच म्हणजेच एका बाकावर एक प्रवासी अशाप्रकारे २२ प्रवाशांना प्रवास करता येईल.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
10:13 AM 08-May-20
