सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आणखी एक कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आला आहे. 27 वर्षाच्या या रुग्णाने मुंबई येथून प्रवास केला आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील हा रुग्ण 28 एप्रिल रोजी मुंबईतील परळ येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला कुडाळ येथील संस्थात्मक विलगीकरणात कक्षात ठेवण्यात आले होते. बाधित क्षेत्रातून आला असल्याने 5 मे रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून त्यास कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. सध्या हा रुग्ण जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 झाली असून त्यापैकी 1 रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. तर 3 रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
