नवी दिल्ली : औरंगाबाद येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आहेत. आज पहाटे औरंगाबाद येथे रेल्वे ट्रॅकवर झोपलेल्या १४ मजुरांचा मालगाडीने धडक दिल्याने मृत्यू झाला. तर, ५ मजूर जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताबाबत दु:ख व्यक्त केले आहे. आपण या दुर्घटनेबाबत रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा केली असून त्यांना तेथील स्थितीवर सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत सांगितले आहे. पीडितांना तसेच सर्वतोपरी मदत केली जाईल असेही पंतप्रधान म्हणाले आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:03 AM 08-May-20
