मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, आता या विषाणूनं मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातही शिरकाव केला आहे. या तुरुंगातील ७२ कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर तुरुंगातील २६ कर्मचारीही बाधित झाले आहेत. राज्यात करोनाचे रुग्ण आढळल्यानंतर तुरुंगातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सरकारनं मोठं पाऊल उचललं. राज्यभरातील तुरुंगांमधील शेकडो कच्च्या कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले. तुरुंगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचंही पालन काटेकोर होईल याकडं विशेष लक्ष दिलं जात आहे. मात्र, मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात कोरोनानं शिरकाव केला. या तुरुंगातील ७२ कैद्यांसह २६ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून स्पष्ट झालं आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
11:07 AM 08-May-20
