औरंगाबाद अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : औरंगाबाद येथे रेल्वे अपघातात मृत पावलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच जखमींवर सरकारी खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या दुर्देवी अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त करतानाच परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. कामगारांनी धीर सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:11 PM 08-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here