विधान परिषदेसाठी भाजपकडून खडसे, मुंडेंना वगळता ‘यांना’ उमेदवारी

मुंबई : भाजपने वरिष्ठ नेते एकनाथ खडसे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी भाजपकडून प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर भाजपात आता पुन्हा अंतर्गत धुसफूस पुढे येण्याची शक्यता आहे. कारण, विधान परिषदेसाठी एकनाथ खडसे यांनी यापूर्वीच वरिष्ठांकडे इच्छा बोलून दाखवली होती. तर त्यांचं नाव वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याचंही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं होतं. एकनाथ खडसेंना विधानसभेतही तिकीट नाकारण्यात आलं होतं. आता पुन्हा विधानपरिषदेलाही त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here