चिपळूण : जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासू नये तसेच समाजाचे देणे लागतो या मनोवृत्तीतून शहरातील आदर्श क्रीडा प्रबोधिनी व परशुराम नगर यांच्यावतीने रविवार दि. १० मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील बांदल हायस्कलमध्ये सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होईल. शिबिरात संकलित होणारे रक्त जिल्हा रुग्णालयास देण्यात येणार असून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नगरसेवक शशिकांत मोदी, कार्यकर्ते भय्या कदम, शशिकांत चव्हाण आदी परिश्रम घेत आहेत. रक्तदात्यांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
