चिपळूण : राज्य शासनाने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात उपासमार होऊ नये म्हणून प्रत्येक तालुक्यात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेण्यात आला. चिपळूणमध्ये देखील बहादूरशेख व जुना स्टॅण्ड शिवभोजन थाळी सुरू झाली आहे. येथील आमदार शेखर निकम यांनी या शिवभोजन थाळी केंद्राला भेट देत शिवभोजन थाळीची चव चाखली. अल्पदरात गरजूंना भोजन मिळावे यासाठी तरुण व्यावसायिक बिपीन कापडी यांनी हे केंद्र सुरू केले आहे. या केंद्राला आ. निकम यांनी मंगळवारी दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी मिलिंद कापडी, मनोज जाधव, अक्षय केदारी, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे आदी उपस्थित होते.
