राजापूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींमार्फत चालू असलेल्या संपूर्ण यंत्रणेचा आढावा आमदार राजन साळवी यांनी घेतला. विविध ग्रामपंचायत कार्यालयांना प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, तलाठी आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व ग्रामस्थांशी चर्चा केली. डॉ. साळवी यांनी उन्हाळे, दोनीवडे, पांगरे, ससाळे, आंगले, फुफेरे, हसोळतर्फे सौंदळ, केळवली, मोरोशी, तळगाव, हातीवले ग्रामपंचायत कार्यालयांना भेट देऊन सविस्तर चर्चा करून माहिती घेतली. त्याप्रसंगी सभापती विशाखा लाड, उपतालुकाप्रमुख रामचंद्र सरवणकर, विश्वनाथ लाड, नरेश दुधवडकर, कमलाकर कदम, योगिता साळवी, जि. प. सदस्य भारती सरवणकर, उमेश पराडकर, नाना गोठम, पं. स. सदस्य प्रमिला कानडे, मानवी सावंत, सरपंच प्रकाश कणेरे, दीपक बेंद्रे, मनोहर सावंत, कांबळे, पाडावे, वरवडेकर, पवार, विनोद सावंत, रमेश सूद, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
