मुंबई : विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 तारखेला निवडणूक होत आहे. भाजपने आपले चार उमेदवार घोषित केलं आहेत. दिग्गजांना डावलून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. विधानसभेनंतर आता विधान परिषदेची उमेदवारीही नाकारण्यात आल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे कमालीचे चिडले आहेत. ‘मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचं काम करणाऱ्यांना संधी द्यायला हवी होती. तसं झालं असतं तर मला आनंद वाटला असता. पण पक्षाला शिव्या देणाऱ्यांना इथं संधी दिली गेली आहे. भाजप कुठल्या दिशेनं चाललाय,’ असा त्रागा खडसे यांनी आज व्यक्त केला.
