होम क्वारंटाइनचा शिक्का असूनही समाजात फिरणाऱ्या ‘त्या’ तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : कोरोनाप्रतिबंधाचा उपाय म्हणून हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला असूनही समाजात वावर करून दापोली तालुक्यातील काळकाई कोंड परिसरात फिरल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर त्या तरुणाविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या ४ ते ५ मे दरम्यान ही घटना घडली आहे. दापोली तालुक्यातील दोन तरुण नुकतेच कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोन्ही तरुण मुंबईतून आले होते. त्यांना तपासणी नाक्यावर अडवून क्वारंटाइन केले होते. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. मात्र अहवाल येण्यापूर्वीच क्वारंटाइन असलेला एक तरुण सर्वत्र वावरत होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या भेटीगाठीच्या घटना पुढे येऊ लागल्या आहेत. दापोलीतील काळकाई कोंड परिसरातदेखील तो फिरला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here