चिपळूण, गुहागरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झंझावात; शिंदे गटाला भोपळाही फोडता आला नाही

0

रत्नागिरी : ग्रामपंचायत निवडणुकीत गुहागर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झंझावात पहायला मिळाला. या निवडणुकीमध्ये 23 पैकी 21 ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत पॅनेलने जिंकल्या आहेत.

शिवसैनिकांच्या झंझावातासमोर बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाची भंबेरी उडाली. त्यांना भोपळाही फोडता आला नाही. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांची गुहागर विधानसभा मतदार संघावर मजबूत पकड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. चिपळूण तालुक्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 11 पैकी 6 ग्रामपंचायती जिंकल्या.

गुहागर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या चिपळूण तालुक्यातील 16 पैकी 14 ग्रामपंचायती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिंकल्या आहेत. दोन ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी विजयी झाली आहे. चिपळूण तालुक्यातही बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला भोपळा फोडता आला नाही.

गुहागर तालुक्यातील सरपंच पदासाठी निवडणुका झालेल्या 12 ग्रामपंचायतींची आज मतमोजणी झाली. त्यामध्ये हेदवी, पांगारी तर्फे हवेली, आरे वाकी पिंपळवट, धोपावे, वरवेली, खोडदे, झोंबडी, चिखली या ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुरस्कृत सरपंच विराजमान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 21-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here