गोविंदगडाच्या पाखाडीचे काम निकृष्ट

0

चिपळूण : येथील एैतिहासीक गोविंदगडावर नागरिक तसेच पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने जाणे येणेसाठी पाखाडी बांधकामसाठी आमदार शेखर निकम यांनी २५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला.

या पाखाडीचे काम निकृष्ठ दर्जाचे सुरू असल्याने ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. या विरोधात श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागावर धडक दिली. पाखाडीचे काम दर्जेदारपणे करण्याची मागणी केली. त्यानुसार शाखा अभियंत्यांनी कामात दुरूस्ती करण्याची सुचना संबंधीत ठेकेदारास करणार असल्याचे सांगितले.

श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता ए.ए.सरदेसाई यांची भेट घेत गोविंदगडावरील पाखाडीची माहिती दिली. पाखाडीचे काम एकदम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. ठेकेदार मनोज जाधव यांना काम देण्यात आले. पाखाडीच्या कामाबाबत गोवळकोट ग्रामस्थांनी ठेकेदारास विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. २५ नोहेंबर २०२२ रोजी श्री. देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी देवस्थान गोवळकोट -पेठमापचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर यांच्यासह पदाधिकारी व विश्वस्तांनी प्रत्यक्ष पाखाडीची पाहणी केली असता ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे निदर्शनास आले. काम घेणारे ठेकेदार जागेवर कधी दिसत नाहीत. त्यानुसार १० डिसेंबर रोजी झालेल्या देवस्थानच्या बैठकीत मनोज जाधव यांना समक्ष बोलावून चौकशी करण्यात आली. सदरची पाखाडी मी दुरूस्त करून देतो, अशी त्यांनी हमी दिली. संपुर्ण पाखाडी किती लांबी व रूंदीची आहे. पाखाडीसाठी किती डबर कुठे वापरावा, खडी, वाळू सिमेंट यांचे प्रमाण किती, पाखाडीवर दिवसातून कितीवेळा पाणी मारावे, याचा कोणताही विचार ठेकेदाराने केलेला नाही. काही ठिकाणी पायऱ्यांना डबर वापरलेला नाही. तसेच पायऱ्यांचे टप्पे किती उंच व रूंदीचे असावेत, याचाही विचार केलेला नाही. त्यामुळे पाखाडीचे काम निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. असेच काम सुरू राहील्यास जिल्हा नियोजन मधून मिळालेला २५ लाखाचा निधी वाया जाणार आहे. त्यामुळे ठेकेदारास बिल देण्यापुर्वी संपुर्ण दुरूस्ती करावी. ठेकेदारास बोलावून योग्य ती समज द्यावी व दर्जेदार काम करण्याची मागणी केली.

यावर शाखा अभियंता सरदेसाई म्हणाले, पाखाडीच्या कामासंदर्भात मनोज जाधव यांना सुचना दिलेल्या आहेत. जिथे सुमार दर्जाचे काम झाले, तिथे दुरूस्ती केली जाईल. निवेदन देताना देवस्थानचे अध्यक्ष प्रसाद चिपळूणकर, उपाध्यक्ष सुरेश शिंदे, सेक्रेटरी उदय जुवळे, सहसेक्रेटरी वसंत भैरवकर, खजिनदार राजू विखारे, विश्वस्त महेश सागावकर, रूषी बुरटे, अजय पावसकर, सुरेश कदम आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 21-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here