राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा 618 वर

मुंबई : कोरोनाच्या संकटात खंबीरपणे उभी असलेली पोलीस यंत्रणा आता कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. गेल्या 24 तासांत 87 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा हा 618 वर गेला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात पोलिसांना सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 6 मे रोजी 38, 7 मे रोजी 36 आणि आता तब्बल 87 पोलिसांना लागण झाली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसात 161 पोलिसांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here