स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथक स्थापन करा : शरद पवार

मुंबई : औरंगाबाद येथे घडलेल्या रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश हेलावून गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या दुर्घेटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. राज्यातील स्थलांतरित मजुरांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यासाठी राज्य सरकारने भरारी पथके स्थापन करावेत, अशी सूचना अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला केली आहे. तसेच या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा, अशी सूचना करतानाच केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन तातडीने स्थलांतरितांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here