दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथून दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १९ डिसेंबर रोजी घडली आहे. या बाबत ओंकार विश्वनाथ साळवी (३१, रा. फणसोप, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार १९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा. त्यांनी आपली दुचाकी (एमएच ०८-टी-५८३२) नवलाई ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये पार्क केली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना आपली दुचाकी न आढळल्यामुळे त्यांनी या संदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 22-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here