रत्नागिरीच्या मधुरा देसाईची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

0

रत्नागिरी : शहरात झालेल्या कोल्हापूर विभागीय कॅरम स्पर्धा 2022 मध्ये अभ्यंकर – कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या मधुरा दर्शन देसाई हिने दुसरा क्रमांक संपादन करीत राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत आपले स्थान पक्के केले.

मधुराबरोबरच याच महाविद्यालयातील सानिका लिंगायत, पायल येलये, चैत्य जैन ह्या विद्यार्थ्यांनी देखील अनुक्रमे पाचवा आणि सहावा क्रमांक मिळवून राज्यस्तरीय फेरी गाठली. जिल्हास्तरीय स्पर्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयात झाली. त्यानंतर विभागीय स्पर्धा रत्नागिरीतील जिल्हा क्रीडा संकुल येथे बुधवारी पार पडली.

पहिल्या सामन्यात मधुराला पुढे चाल मिळाली. त्यानंतर 4 सामने जिंकल्यानंतर सिंधुदुर्गातील केशर निर्गुण आणि मधुरा यांच अंतिम सामना रंगला. मात्र या सामन्यात अपेक्षित खेळ न झाल्याने तिला दुसरा क्रमांक मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 22-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here