नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरु असून या टप्प्यात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार अनेक राज्यांनी दारुविक्रीला परवानगी दिली. पण दारुविक्रीच्या आदेशात स्पष्टता नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या खंठपीठासमोर आज या याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने यावेळी कोणताही आदेश देण्यास नकार देत याचिका निकाली काढली. त्याचबरोबर सोशल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन होण्यासाठी सर्व राज्यांनी होम डिलिव्हरीचा विचार करावा, अशी सूचना केली आहे.
