खचाखच भरलेल्या स्टेडियममुळेच जिंकण्याची जिद्द निर्माण होते : विराट कोहली

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी 39 लाख, 17,585 इतकी झाली असून 13 लाख, 44,136 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 2 लाख 70,720 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. पाकिस्तानातील रुग्णांची संख्या 25, 837 झाली असून 594 जणांचा मृत्यू झाला आहे. 7530 लोकं बरी झाली आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 56,409 वर पोहोचला असून 16,790 रुग्ण बरे झाले आहेत. 1890 जणांना प्राण गमवावे लागले. कोरोना व्हायरसचे संकट अजून किती काळ आपल्यासोबत राहील याबाबत कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे क्रीडा स्पर्धा बंद स्टेडियमवर खेळवण्याचा विचार सुरू आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या पर्यायाशी फारसा सहमत नाही, परंतु लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे, हे तो कबुल करतो. प्रेक्षकांविना क्रिकेट खेळण्यावर कोहलीनं शुक्रवारी स्पष्ट मत व्यक्त केलं. ”सध्याची परिस्थिती पाहता प्रेक्षकांविना क्रिकेट सुरू केले जाऊ शकते. पण, याचा लोकं आणि खेळाडू कसा स्वीकार करतील, हे मलाही माहीत नाही. आम्हाला खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याची सवय झाली आहे. त्यातूनच जिंकण्याची जिद्द निर्माण होते आणि आम्हाला बळ मिळतं. चुरशीच्या सामन्यात खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यात जाणवणारे ते दडपण, बंद स्टेडियममध्ये कसे निर्माण होईल? ती भावना निर्माण करणे अवघड आहे,” अशी खंत विराट कोहलीने व्यक्त केली आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here