नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत तब्बल कोरोनाचे ३३९० नवीन रुग्ण देशभरात आढळले असून देशातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी ५६,३४२ एवढी झाली आहे. तर मागील चोवीस तासात १३७३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत १६,५४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. देशभरात मागील २४ तासांमध्ये कोरोनाची बाधा होऊन १०३ जणांचा मृत्यू झाला. तर देशात आत्तापर्यंत कोरोनाची बाधा होऊन १८८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
