
मुंबई : मुंबईसह उपनगरातील कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी लक्षात घेता नवी मुंबईमधील एपीएमसीची पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सोमवारपासून एका आठवड्यासाठी म्हणजे ११ ते १७ मे पर्यंत अन्नधान्य, भाजी, फळ, कांदा-बटाटा, मसाला मार्केट पूर्णपणे बंद राहणार असल्याचा हा निर्णय कोकण आयुक्त, पोलीस, माथाडी नेते यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
