संगमेश्वर: एसटी तील स्वच्छता कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित

0

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील एसटी विभागाच्या बस स्थानकातील स्वच्छता करणारे कर्मचारी तीन महिने वेतनापासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांचे कुटुंब वेतनाअभावी उपासमारीत जीवन जगत आहे.

बसस्थानकात स्वच्छता ठेवणे व शौचालय, मुतारी यांचीही स्वच्छता ठेवण्यासाठी ठेकेदार कामकाज करत आहे. त्यांना या कर्मचारी वर्गाच्या यातना दिसत नाहीत का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

तालुक्यातील देवरूख, साखरपा, माखजन व संगमेश्वर या ठिकाणी कर्मचारी स्वच्छतेसाठी काम करत आहेत. हे कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे करत आहेत. तरीही त्यांना मागील तीन महिन्यांत वेतन मिळालेले नाही. यामुळे या कर्मचारी वर्गाच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. लवकरात लवकर ठेकेदाराने वेतन अदा करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 23-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here