डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल लांजा येथे आजी आजोबा दिन उत्साहात साजरा

0

लांजा : साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी संचलित डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल लांजा येथे आजी आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

शाळेचे संस्थापक संस्थापक रवींद्र (अण्णा) सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर भाऊ वंजारे, नायब तहसीलदार श्रीम. केळुसकर, लांजा महाविद्यालयाचे प्राचार्य कुलकर्णी, दीपक कामत, संजय तेंडुलकर, समिक्षा कामत आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र सामंत यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात संधी देऊन त्यांचा सर्वांगिण विकास करण्यावर भर देण्यात येईल.

विशेषत: या कार्यक्रमाला ९० वर्षांपुढील २ खापर पणजी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित आजी-आजोबांनी अंताक्षरी, मेहंदी काढणे, सेल्फी पॉईंट, हाताचे ठसे अशा उपक्रमांसहीत आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सातपुते यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुग्धा सार्दळ यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 24-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here