ब्रेकींग : विद्यार्थ्यांचा मोर्चा पोलिसांनी परतवला

रत्नागिरी : एमआयडीसी मध्ये राहणाऱ्या परराज्यातील विद्यार्थ्यांनी आज अचानक मोर्चा काढताच पोलीस दल अलर्ट झाले. एमआयडीसी मधून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने जात असताना शिवाजीनगर येथे पोलिसांनी मोर्चाला अडवले. या तामिळनाडूतील विद्यार्थ्यांना आपल्या गावी जायचे होते. लॉक डाऊन मुळे सुमारे 450 विद्यार्थी रत्नागिरीत अडकून पडले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे आणि शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढली व पुढील तीन दिवसांत यावर काहीतरी तोडगा काढू असे सांगितले. या विद्यार्थ्यांना आता पुन्हा एमआयडीसी येथे पाठवण्यात आले आहे

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:38 AM 09-May-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here