
मुंबई : मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत ७४८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या १२,१४२ झाली आहे. तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूची संख्या ४६२ झाली आहे. गेल्या २४ तासांत १५४ रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५८९ झाली आहे.
