मोकाट जनावरांच्या मालकावर कारवाई करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने दिल्या सूचना

0

रत्नागिरी : मोकाट जनावरांमुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी आणि मोकाट गुरांच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाने तशा सूचना ग्रामपंचायती आणि नगर परिषद प्रशासनांना दिल्या आहेत.

अनेकदा शहरात मोकाट जनावर रस्त्यावर ठिय्या मांडतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन अपघातही घडतात. अनेकदा याबाबत कारवाईही केली जाते. मात्र, आता नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांना आता मोकाट गुरांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. मोकाट जनावरांच्या मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 26-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here