मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांना हटवून इकबाल चहल यांची नियुक्ती

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तपदावरून प्रवीण परदेशी यांची तडकाफडकी बदली करत त्यांच्या जागी इकबाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्याचा आदेश शुक्रवारी सायंकाळी सामान्य प्रशासन विभागाने काढला. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव पदावर कार्यरत असलेल्या चहल यांनी या आदेशाची प्रत प्राप्त होताच रात्रीच आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे तर नगरविकास विभागाचे विद्यमान प्रधान सचिव इक्बाल चहल हे आता मुंबई पालिका प्रशासनाचे प्रमुख असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here