मंजुरी मिळालेल्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी बसस्थानकावरच होणार

रत्नागिरी : कोरोना प्रतिबंधक लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी एसटीतून प्रवास करण्याकरिता आता वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही. प्रवास सुरू होण्यापूर्वी बसस्थानकावरच त्यांची तपासणी केली जाणारा आहे. इतर जिल्ह्यातील नागरिकांना आपापल्या जिल्ह्यात जाण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. इतर जिल्ह्यात जाणाऱ्या प्रवासासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची अट सार्वजनिक वाहनातून होणाऱ्या प्रवासाकरिता स्थगित करण्यात आली आहे. यापूर्वी अशा वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता होती. नव्या बदलानुसार आता सर्व प्रवाशांची बसमध्ये बसण्यापूर्वी तपासणी करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here