शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोट्यवधींचा घोटाळा : संजय राऊत

0

मुंबई : हिवाळी अधिवेशात विरोधकांनी जमिनीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उपस्थिती लावली आहे.

खासदार संजय राऊतही नागपूरमध्ये उपस्थित आहेत. आज राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना अधिवेशनात भ्रष्टाचार विरोधात लढले, आणि आता सत्तेत असताना आम्ही भ्रष्टाचार विरोधात लढत आहे, त्यांना हा लवंगी बॉम्ब वाटतो, देवेंद्र फडणवीस बदलले आहे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना भ्रष्टाचाराविरोधात लढले. पण ते आता भ्रष्टाचाराविरोधात लढत नाहीत. काल उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे वाती तयार आहेत. सीमा प्रश्नावरचा ठराव हा अत्यंत महत्वाचा आहे. सीमा प्रश्नाचा ठराव वाहून जाऊ नये, आणि सरकारला कारण मिळू नये. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे, सरकारने केलेला ठराव हा अत्यंत बुळचट आहे, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.

36 एकर जमीन यांनी अशीच वाटली आहे, कोट्यवाधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. विधानसभेत रोज लोकशाहीची हत्या होत आहे. विधानसभेचे अध्यक्ष विरोधी पक्षाचा आवाज दाबत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष पक्षपाती आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी लगावला.

देवेंद्रे फडणवीस यांना भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा लढाव लागणार आहे. त्यांना या भ्रष्ट सरकारच ओझ जास्त दिवस वाहता येणार नाही. कृषी मंत्र्यांनी खंडणी गोळा केली आहे, संपूर्ण सरकार सध्या अडचणीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सहानभुती वाटते, असंही खासदार संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादची जमीन केंद्रशासीत करावी. हाच खरा प्रस्ताव राज्य सरकारने केला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 27-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here