चिपळुणात कौटुंबिक वादातून हाणामारी; २५ जणांवर गुन्हे दाखल

चिपळूण : तालुक्यातील धामणवणे शिगवणवाडी येथील शिगवण आणि बेंडके कुटुंबात कौटुंबिक वाद आहेत. या दोन कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली. गुरुवारी (ता. ७) रात्री घडलेल्या घटनेबाबत परस्परविरोधी फिर्यादी चिपळूण पोलिसांत दाखल आहेत. याप्रकरणी २५ जणांवर गुन्हा दाखल झाला. गुरुवारी रात्री दहाला हा कौटुंबिक वाद उफाळून आला आणि दोन्ही कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली. लाठ्याकाठ्या तसेच लथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राजाराम कृष्णा शिगवण यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यामध्ये सोमा सीताराम बेंडके व अन्य जणांनी घरात घुसून लाथाकाठ्यांनी मारहाण केली असल्याचे म्हटले तर सोमा सीताराम बेंडके यांनी सुनील पांडुरंग शिगवण व अन्य जणांनी जबर मारहाण केल्याची फिर्याद दिली आहे. साथरोग प्रतिबंध कायदा आणि आपत्तीव्यवस्थापन कायदा भंग केल्याप्रकरणी एकूण २५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक सागर चव्हाण करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here