मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे परराज्यातील रोजगारासाठी आलेले लाखो मजूर महाराष्ट्रात अडकून बसले आहेत. त्यांना त्यांची राज्ये घेत नाहीत. या मजुरांना महाराष्ट्र सरकार एसटीने त्यांच्या राज्यात सोडायला तयार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी यासंबंधात चर्चा केल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी सरकारकडून एसटी बसची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे शरद पवार म्हणाले. तर गोयल यांनी देखील या मजुरांसाठी रेल्वेची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिल्याचे पवार यांनी म्हटले आहे. मात्र, काही राज्ये या मजुरांना स्वीकारण्यास विरोध करत आहेत. महाराष्ट्र एसटी द्यायला तयार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता या राज्यांशी मध्यस्थी करावी, असे आवाहन करत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:39 PM 09-May-20
