परवान्याशिवाय गुरे वाहतूक करणाऱ्या संशयिताला कोठडी

0

रत्नागिरी : वाहन चालविण्याचा तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा परवाना नसताना गुरे वाहतूक करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

ही घटना सोमवार २६ डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वा. सुमारास बावनदी ते पाली अंतर्गत वेळवंड रस्त्यावर निदर्शनास आली होती. शशांक संजय सावंत (रा. साठरेबांबर, सावंतवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.

सोमवारी रात्री संशयित सावंत हा बोलेरो पिकअप (एमएच- ०८ डब्ल्यू- ३६३१) मधून वाहन चालविण्याचा व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा परवाना नसताना तीन बैलांची वाहतूक करत असताना वेळवंड रस्त्यावर पोलिसांनी त्याची गाडी थांबवून तपासणी व चौकशी केली असता तीन बैल गाडीच्या हौद्यात दोरीने बांधलेले दिसून आले. बैलांना खाद्य अगर पाणीही न देता गाडीमध्ये वेदना होतील अशी रितीने दोरीने बांधले होते. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारे तपासणी न करता वाहतूक करत होता. पोलिसांनी तीन बैल व पिकअप गाडीसह ३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस फौजदार मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 28-12-2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here