मला त्या निर्णयाचा अजिबात धक्का बसला नाही : पंकजा मुंडे

मुंबई : भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजा यांनी भाजपच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नसल्याचे म्हटले आहे. भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेकजण फोन करुन दु:ख व्यक्त करतायत. पण ‘वाघांनो असं रडताय काय मी आहे ना…, तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही बस साहेबांचे आशिर्वाद आहेत…’ दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या ‘त्या’ चारही उमेदवारांना आशिर्वाद, असे पंकजा यांनी म्हटले आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here