दुचाकी लावण्यावरून चाकूने वार करत ठार मारण्याची धमकी; संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : येथे दुचाकी जागेत लावू नकोस, पुढे लाव, असे सांगितल्याच्या रागातून चाकूने वार करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मुनीर पावसकर (रा. राजिवडापूल, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ७) दुपारी एकच्या सुमारास राजिवडा पूल येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महमद शरीफ जैनुद्दीन फणसोपकर (वय ४८, रा. राजिवडापूल, रत्नागिरी) हे व संशयित एकाच मोहल्ल्यात शेजारी-शेजारी राहतात. संशयित दुचाकी फणसोपकर यांच्या जागेत लावत होता. फणसोपकर यांनी दुचाकी माझ्या जागेत लावू नकोस पुढे लाव, असे सांगितले. त्याचा राग मनात धरून फणसोपकर पाणी भरत असताना संशयिताने खिशातील चाकू काढून फणसोपकर यांच्या हातावर वार केला. तसेच शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी महमद फणसोपकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल पालांडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here